Current affairs | चालू घडामोडी

चालू घडामोडीMajhinaukari.xyz

व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम – ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?

उत्तर – उत्तर प्रदेश

प्रश्न क्र. २

आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील?

उत्तर – आयुष्मान भारत – पंतप्रधान जनआरोग्य योजना

प्रश्न क्र. ३

भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे?

उत्तर – आरोग्य सेतू

प्रश्न क्र. ४

ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला?

उत्तर – मालदीव

प्रश्न क्र. ५

RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे?

उत्तर – १५ टक्के

प्रश्न क्र. ६

कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि MyGov सोबत आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक COVID-19 चॅटबोट लाँच केला आहे?

उत्तर – फेसबुक

प्रश्न क्र. ७

अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?

उत्तर – वैज्ञानिक

प्रश्न क्र. ८

बेनी प्रसाद वर्मा यांचे अलीकडेच निधन झाले, ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते?

उत्तर – समाजवादी पार्टी

प्रश्न क्र. ९

इंडिया रेटिंग्ज (Ind-Ra) नुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती राहील?

उत्तर – ३.६ टक्के

प्रश्न क्र. १०

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाऊनकाळात देशात फसलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी ‘Stranded in India’ पोर्टल सुरू केलं आहे?

उत्तर – पर्यटन मंत्रालय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *