Current Affairs | चालू घडामोडी

1.भारत आणि _____ या देशांनी 50-70 कि.मी.च्या मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली
उत्तर :- इस्त्रायल.
2.भारतीय भूदलाच्या नव्याने तयार केलेल्या मानवाधिकार कक्षाचे प्रमुख कोण आहेत
उत्तर :- मेजर जनरल रँकचे अधिकारी.
3.भारतीय भूदलात पहिले अतिरिक्त महासंचालक (मानवाधिकार) म्हणुन कोणाची निवड झाली
उत्तर :- मेजर जनरल गौतम चौहान .
4.कोणत्या शहरात भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) मुख्यालय तयार केले जाणार आहे
उत्तर :- नवी दिल्ली .
5.भारतातली पहिली शहरी सहकारी बँक कोणती जी RBIच्या स्वयंसेवी संक्रमण योजनेंतर्गत लघु वित्त बँकेत (SFB) रूपांतरित झाली
उत्तर:- शिवालिक मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक . ( .शिवालिक स्मॉल फायनान्स बँक बनली).
6.भारतीय रिझर्व्ह बँकेनी 250 कोटी रुपयांच्या प्राथमिक योगदानासह ‘____’ तयार केला आहे, ज्याचा अधिग्रहणकर्त्यांना स्तर-3 ते स्तर-6 केंद्रे आणि ईशान्य राज्यांमध्ये PoS पायाभूत सुविधा तैनात करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपयोग केला जाणार

उत्तर :-  ‘देयके पायाभूत सुविधा विकास निधी’ (Payments Infrastructure Development Fund).

7.जागतिक बँकेच्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था _____ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे

उत्तर :-  9.6 टक्के.

8.जागतिक बँकेच्या मते, 2021 साली भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ____ होण्याची शक्यता आहे

उत्तर :-   5.4 टक्के.

9.केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि _____ यांच्यात चौदा क्षेत्रातल्या “विशिष्ट कौशल्य कामगार” संबंधित प्रणालीच्या योग्य संचालनासाठी भागीदारीच्या मूलभूत कार्यचौकटीवर सहकार्य करण्यासाठी करार करण्यास मान्यता दिली

उत्तर :-   जपान सरकार.

10.शिक्षण मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, MSME मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या संस्थांनी संयुक्तपणे चालविलेला कार्यक्रम कोमता, ज्याचा उद्देश भारतीय मूल्य प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळण्यांची कल्पना बनविणे आहे

उत्तर :-   टॉयकॅथॉन-2021.

11.DRDOची पर्यावरण-अनुकूल बायोडायजेस्टर एकक (Mk-II तंत्रज्ञान) सुविधा उपलब्ध करून पाण्याचे संरक्षण आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि _____ एकत्र काम करत आहेत

उत्तर :-   महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा-मेट्रो).

12.हजारो पाळीव पक्ष्यांना H5N8 विषाणूची लागण झाल्यामुळे या राज्यात बर्ड फ्लूला राज्य संकट म्हणून घोषित केले गेले

उत्तर :-   केरळ.

13.महाराष्ट्रात मराठी पत्रकारिता दिन कोणता दिवस साजरा केला जातो

उत्तर :-  6 जानेवारी 2021.

Share on facebook
Share on whatsapp
Share on telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *